बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने (Maharashtra government) 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरात हे स्मारक होणार आहे. आज (1 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निधीस मान्यता दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगीचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, इत्यादी कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा / गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक, इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे.

दरम्यान, पहिला आणि दुसऱा टप्पा मिळून एकूण 400 कोटींचा खर्च होणे राज्य सरकारला अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणारा 400 कोटींचा खर्चा सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment