गांधी हे केवळ कुटुंब नसून भारताचा ‘डीएनए’ आहे – यशुमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा ‘डीएनए’ आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादावरून त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही तर तो भारताचा डीएनए आहे. जर सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे. देशाला राहुल गांधी यांची गरज आहे, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले.

देशातील काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यानंतर नाराज झालेल्या सोनिया गांधी आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या पक्षाध्यक्षपदाचा त्याग करण्याची  शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसमध्ये दोन तट निर्माण झाले आहेत.

You might also like