कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८०० च्या वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंर ६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील २ रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याचे समजत आहे. कृष्णा हाॅस्पिटल येथे उपचार घेत असणारा एक रुग्ण महारुगडेवाडी या गावातील असून कोरोनारुग्ण डोंगरी भागात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणुन जिल्हा प्रशासनाने महारुगडेवाडी गाव सील केले आहे.
महारुगडेवाडी येथे कोरूना बाधित रुग्ण सापडल्याने डोंगरी भागात असणाऱ्या विभागात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महारुगडेवाडी गावाच्या हद्दी चारी बाजूने सील करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांकडून गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावात औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सदर कोरोना बाधित रुग्ण मुंबईत मच्छी मार्केट मध्ये काम करत होता. मुंबई हुन २८ मार्च ला आपल्या जावयाच्या रिक्षांमधून मुलीसह दोन नातवंडा बरोबर पाच तास प्रवास करून गावाकडे आला होता. त्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने ही व्यक्ती जवळपासच असलेल्या एका खासगी रुग्णालयात गेली असता या व्यक्तीची लक्षणे कोरोना सदृश असल्याने खासगी डॉक्टरांनी त्यांना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर व्यक्तीने दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात जाऊन तात्पुरते उपचार घेतले. तरीही त्रास वाढत असल्याने मागील दोन दिवसापूर्वी ही व्यक्ती कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाली. त्याच्या घशातील श्रावाचे नमुने पुणे येथे पाठवले असता आज सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. ही माहिती महारुगडे वाडी गावासह परिसरात वार्यासारखी पसरली त्यानंतर गावासह पूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, गावच्या हद्दी सील करण्यात आल्या असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वच नागरिकांना तपासणीसाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती आपल्या जावया सोबत गावाकडे रिक्षाने आली होती. हा जावई गावाशेजारीलच जिंती येथील असून या गावातही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास 20 ते 25 लोकांना प्रशासनाने तात्काळ तपासणीसाठी कराड ला कृष्णा रुग्णालयात हलवले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा
करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?