आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । ‘राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे’ अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे होता. हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेसाठी बैठका घेत आहे. या तिन्ही पक्षात होणाऱ्या चर्चां म्हणजे तीन अंकी नाटक आहे. आशिष शेलार यांच्या नव्यानं सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महासेनाआघाडीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेकडून शेलार यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.

‘शेलार यांनी या नाटकाचा शेवट नक्की पाहावा. आम्ही या नाटकांत नक्की यशस्वी होणार आहोत. तेव्हा तुम्ही ते पहाच ‘असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शेलार यांना प्रतिउत्तर दिलं. शेलार यांच्या विधानावर शिवसेनेकडून सुद्धा तितकीच तिखट प्रतिक्रिया आली आहे.’आशिष शेलार हा मार्केट नसलेला माणूस आहे. त्यांच्या नौटंकीचे दिवस कधीच संपले आहेत. म्हणून त्यांच्या विधानाला गांभीर्यांने घेण्याची गरज आम्हाला वाटतं नाही.’ अशा शेलक्या शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शेलार यांच्या विधानाचा समाचार घेतला.

शेलार यांच्यानुसार सत्तास्थापनेचं जर तीन नाटक आहे तर या नाटकाचा शेवट सत्तास्थापनेत होणार कि मध्याअवधी निवडणुकांत हे येणाऱ्या काही दिवसात नक्कीच राज्यातील जनतेला पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment