टीम हॅलो महाराष्ट्र | महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. लवकरच या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्यास सुरू होईल. या योजनेविषयी शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या शंकांच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दूरध्वनी क्रमांक जाहीर केला आहे. या दूरध्वनी द्वारे शेतकऱ्यांना या योजनेविषयीची माहिती दिली जाणार आहे. मंत्रालय स्तरावर हा संपर्क कक्ष सुरू राहणार आहे.
कक्षातील दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे :
कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका असल्यास त्याच्या निरसनासाठी मंत्रालय स्तरावर संपर्क कक्ष. कक्षातील दूरध्वनी क्रमांक ८६५७५९३८०८, ८६५७५९३८०९, ८६५७५९३८१० असे असून त्यावर योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी http:mjpsky.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका असल्यास त्याच्या निरसनासाठी मंत्रालय स्तरावर संपर्क कक्ष. कक्षातील दूरध्वनी क्रमांक ८६५७५९३८०८, ८६५७५९३८०९, ८६५७५९३८१० असे असून त्यावर योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी http:/mjpsky.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 20, 2020