नेहरू सिगारेट ओढायचे, गांधीजींचा मुलगाही ड्रग्ज घ्यायचा; ‘या’ भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारमधील केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांनी राजस्थानमधील भरतपूर येथे आयोजित नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमा वेळी एक बेताल वक्तव्य केले आहे. नेहरू ड्रग्ज घेत होते तर गांधी दारू पीत होते असे बेताल वक्तव्य त्याने केले आहे. त्यांच्या (Kaushal Kishore) या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राज्यमंत्री कौशल किशोर?
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) म्हणाले कि ‘जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घेत असत, सिगारेट ओढत असत आणि महात्मा गांधींचा एक मुलगा ड्रग्स घेत असे. याबाबत वाचून बघा तुम्हाला खरी माहिती मिळेल. ते पुढे म्हणाले की, अमली पदार्थांमुळे जगासह आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केले आहे.

अमली पदार्थांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानीबाबत लोकांमध्ये जितकी भीती निर्माण होईल तितकीच भीती निर्माण करावी, असे आमचे आवाहन (Kaushal Kishore) आहे. ज्याप्रमाणे विषाची दुकाने नाहीत, त्याचप्रमाणे दारुची दुकानेही बंद करण्यात यावी असे ते म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचा हा व्हिडिओ जारी केला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या