Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी फुटली!! काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Mahavikas Aghadi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. महाविकास आघाडीतून (MahaVikas Aghadi) निवडणूक न लढवता काँग्रेसने (Congress) स्वबळाची नारा दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय असेही वडेट्टीवार यांनी म्हंटल. विजय वडेट्टीवार यांच्या या घोषणेनंतर ठाकरे गटाला आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे.

हि निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांची- Mahavikas Aghadi

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हंटल, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. मुंबई महापालिका ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी महापालिका आहे. या महापालिकेते जे आवश्यक प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही लढू. आम्ही सगळ्यांनी अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत. कारण हि निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांची असते. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. आधी आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल. जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणे उद्देश आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढायचं असा आमचा निर्णय झाला आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हंटल. Mahavikas Aghadi

समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करु. उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि युतीचा प्रस्ताव आला तर स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. तसेच शरद पवार यांचा प्रस्ताव आला त्याचा पण विचार करू असे सांगायलाही विजय वडेट्टीवार विसरलं नाहीत. मुंबई महापालिकेत आमच्या नेहमी ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. उलट आमच्या विरुद्ध जे तीन पक्षही सत्तेत वेगळे लढत आहेत. यात भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट हे वेगळे लढणार आहेत. जर त्यांचे विभाजन होत नाही, तर आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.