महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोधचं काय पण आंतरपाटही नाहीये; राऊतांचे फडणवीसांना उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचं विधान केलं होतं त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोधचं काय पण आंतरपाटही नाहीये, हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल असा विश्वास संजय राऊत यांनी आज बोलून दखवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस यांच्या सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याच्या विधानावरून सवाल केला असता राऊत म्हणाले कि, “देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. पण अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाहीये. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही आंतरपाट नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांनी बनवलेलं आहे. ही खिचडी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यांनीही ठाम विश्वास व्यक्त केला आहे की, हे सरकार पाच वर्ष काम करेल,” असं राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजपा आणि शिवसेनेचं सरकार याआधी राज्यात होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नाहीत. खटका हा शब्द प्रसारमाध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने खटका हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे हा खटका हा शब्द मीडियाने मनातून काढून टाकावा असाही सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment