मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाविकास आघाडी सरकारची इच्छा नाही -आमदार हरिभाऊ बागडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी दिलेल्या निकालामुळे यावर्षी म्हणजे 2020-21 या वर्षात मराठा समाजाला मराठा आरक्षण कायद्यांतर्गत सरकारी नोकरी किंवा शैक्षणिक प्रवेश घेता येणार नाही. मराठा आरक्षण आंदोलनाला हा मोठा धक्का असल्याचं मत सर्व मराठा समाजातून व्यक्त होत आहे.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आज भाजपचे नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापित करावा आणि केंद्र सरकारच्या आयोगाला त्यांनी दिलेला निकाल पाठवा.

या पत्रकार परिषदेत आमदार हरिभाऊ बागडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र डांगले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारची इच्छा नाही असे आमदार हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले. आघाडी सरकार आपल्या अपयशाचे खापर केंद्र सरकारच्या माथ्यावर फोडत आहे आणि स्वतःची बाजू सुरक्षित करून घेत आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना त्यांनी सांगितले की,

कोणत्याही समाजाच्या भावनांची सरकारने अशा प्रकारे खेळ करणे अत्यंत गैर आहे. महाविकास आघाडीने हा खेळ बंद करावा आणि हा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे.

– आमदार हरिभाऊ बागडे

Leave a Comment