Mahavitaran Bharti 2024 | तुमचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधत असाल तरीदेखील तुम्हाला अजूनही नोकरी मिळाली नसेल, तर आता तुमचा हा शोध संपणार आहे. कारण सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत (Mahavitaran Bharti 2024) एक मेगाभरती निघालेली आहे. यामध्ये तब्बल 5347 पदांची भरती केली जाणार आहे. विद्युत सहाय्यक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज पाठवण्यात आलेले आहेत. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आता अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? शैक्षणिक पात्रता? आणि पगार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव –
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Bharti 2024) अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
पदसंख्या
विद्युत सहाय्यक या पदांसाठी 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
वयोमर्यादा | Mahavitaran Bharti 2024
पात्र उमेदवाराचे वय हे 18 ते 27 दरम्यान असणे गरजेचे आहे. केवळ याच वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 12पास असणे गरजेचे आहे
परीक्षा शुल्क
खुला वर्गातील उमेदवारांना 250 रुपये आणि जीएसटी
मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवारांना 125 रुपये आणि जीएसटी.
अर्ज पद्धती
विद्युत सहाय्यक (Mahavitaran Bharti 2024) या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
20 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मासिक वेतन
प्रथम वर्ष – 15 हजार रुपये
द्वितीय वर्ष -16 हजार रुपये
तृतीय वर्ष -17 हजार रुपये.
अर्ज कसा करावा
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जा आणि ते सगळी माहिती वाचा आणि त्यानंतर शेवटच्या तारखेपूर्वी हा अर्ज भरा.