Mahavitaran vidyut sahayak Bharti | महावितरणामध्ये 5347 जागांसाठी मेगाभरती, दरमहा मिळणार तब्बल एवढा पगार

Mahavitaran vidyut sahayak Bharti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahavitaran vidyut sahayak Bharti | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची भन्नाट अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Mahavitaran vidyut sahayak Bharti) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती तब्बल 5,347 रिक्त जागांसाठी निघालेली आहे. त्यामुळे आता या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल, तर लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

पदसंख्या | Mahavitaran vidyut sahayak Bharti

या भरती अंतर्गत किती सहाय्यक पदाच्या 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या बारावी पास त्याचप्रमाणे माध्यमिक शाल्येलांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र गरजेचे. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयोमर्यादा

विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

परीक्षा शुल्क

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये एवढी फी असणार आहे. तर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 125 रुपये परीक्षा फी असणार आहे.

अर्ज पद्धती

या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

वेतन

प्रथम वर्ष- 15,000 रुपये
द्वितीय वर्ष – 16,000 रुपये
तृतीय वर्ष – 17000 रुपये

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना नीट वाचा.
  • अर्ज करताना आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा