मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करा! दरेकरांचा नितीन राऊतांना खोचक सल्ला

उस्मानाबाद । भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर आज उस्मानाबादमध्ये आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी राऊतांवर जोरदार टीका केलीय. त्याचबरोबर बिलं तपासायला ऊर्जामंत्री काय टीसी आहेत का? असा सवालही दरेकर यांनी केला आहे.

ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे, त्यावरही दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आधी 100 युनिट मोफट देण्याची घोषणा केली, आता म्हणाले सवलतीमध्ये देऊ, हे वीज ग्राहकांच्या जखमेवर मिठ चोळणं आहे. हे सरकार जुलमी असून, राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण असल्याचा घणाघात दरेकरांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like