हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत गटविजेत्या मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरला 20 लाखात विकत घेतले. अर्जुन मुंबईच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांना आनंद झाला असला तरी काही लोकांनी नेपोटिझम चा उल्लेख करत निशाणा देखील साधला आहे. परंतु मुंबई इंडियन्स चे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मात्र आपण अर्जुनला संघात का घेतलं याच कारण सांगितलं आहे.
अर्जुन तेंडुलकरला फक्त आणि फक्त त्याच्या गुणवत्तेच्या आधारे विकत घेतलं असल्याचं त्याने म्हटलं आहे. ESPNcricinfo दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. मुंबई इंडियन्ससोबत खेळणं अर्जुनसाठी एक शिकण्याची प्रक्रिया असेल असा विश्वास महेला जयवर्धेनेने व्यक्त केला आहे. २१ वर्षीय अर्जुनला शिकण्याची आणि आपल्या वेळेसोबत खेळ सुधारण्याची संधी असल्याचंही त्याने सांगितंल आहे.
अर्जुनला वेळ देण्याची तसंच जास्त दबाव येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. फक्त त्याला खेळ सुधारु दे आणि काय आपला मार्ग निवडू दे…आम्ही त्याच्या मदतीसाठी आहोतच,” असंही त्याने सांगितलं
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’