महेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास लव्हस्टोरी

टीम हॅलो महाराष्ट्र । तुम्हाला संजय दत्तचा वास्तव चित्रपट आठवतोय का? आठवायलाच पाहिजे. एक सामान्य माणसाचं परिस्थितीमुळे गुन्हेगारात झालेलं रूपांतर संजय दत्तने बेदरकार अभिनय करत लोकांसमोर आणून ठेवलं होतं. या चित्रपटात संजय दत्तसारख्या बेरकी माणसालाही प्रेमाची चटक लावणारी अभिनेत्री होती नम्रता शिरोडकर. गालावर तीळ असणारी ही अभिनेत्री आपल्या छोट्याशा भूमिकेनेसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली होती. याच नम्रता शिरोडकरचा आज वाढदिवस. २२ जानेवारी १९७२ रोजी जन्मलेल्या नम्रताने आज आपल्या आयुष्याच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नम्रताला १९९३ चा मिस इंडिया फेमिना हा किताबही मिळाला होता. मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप सोडल्याचं पहायला मिळालं. नम्रताने अस्तित्व, हेराफेरी, वास्तव, वामसी, पुकार, कच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे, एलओसी कारगील अशा दर्जेदार चित्रपटांत काम केलं आहे.

Untitled design (17)

दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूसोबत वामसी या चित्रपटात काम करत असताना नम्रता त्याच्या प्रेमात पडली. आपल्यापेक्षा वयाने ४ वर्ष लहान असणाऱ्या महेशबाबूशी आयुष्याची गाठ बांधताना तिने कोणत्याच बाह्यपरिणामांचा विचार केला नाही. पहिल्याच चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होताना त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर ४ वर्षं एकमेकांसोबत प्रेमात राहिल्यानंतर १० फेब्रुवारी २००५ ला दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रता चित्रपटात फारशी दिसली नाही परंतु महेशबाबुंच्या करियरने मात्र यशाचे शिखर मागील 15 वर्षांत गाठल्याचं पहायला मिळालं. आज नम्रताच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरही महेशबाबू यांनी याचा खुलासा केला असून ‘माझ्या यशातील पहिली भागीदार असलेल्या माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा संदेश महेशबाबूंनी ट्विटरवर टाकला आहे.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

रंग यावा म्हणून येवले चहात केली जाते भेसळ, आणखी कोणत्या त्रुटींमुळे एफडीएने येवलेंना फटकारले?

मोठी बातमी: CAA ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्र सरकारला नोटीस

असा असायचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा अर्थसंकल्प!

You might also like