Mahila Nyay Guarantees : महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देणार; काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरातील महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘महिला न्याय गॅरेंटी’ (Mahila Nyay Guarantees) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के कोटा आणि महिलांसाठी वसतिगृह देखील उभारण्यात येणार आहेत. काँग्रेसने तब्बल ५ मोठमोठ्या घोषणा करत महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या या घोषणेनंतर निवडणुकीत त्याचा किती परिणाम पाहायला मिळतो ते आता बघायला हवं.

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधींनी महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. देशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर भारतातील प्रत्येक गरीब महिलांच्या खात्यात दरवर्षी १ लाख रुपये जमा होतील. आम्ही हे क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. महिलांचे उत्पन्न दुपटीने (Mahila Nyay Guarantees) वाढेल. जर नरेंद्र मोदी अब्जाधीशांना १६ लाख कोटी रुपये देत असतील तर काँग्रेस देशातील करोडो महिलांच्या खात्यात १ लाख रुपयांची रक्कम नक्कीच देऊ शकते असं राहुल गांधी यांनी म्हंटल.

महिलांसाठी काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा कोणत्या – Mahila Nyay Guarantees

१) देशातील गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देणार.

२) केंद्र सरकारमधील सर्व नवीन भरतींपैकी ५० % जागा महिलांसाठी राखीव असेल.

३) आशा, अंगणवाडी आणि माध्यान्ह भोजन करणाऱ्या महिलांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाणार आहे.

४) सर्व पंचायतींमध्ये एक अधिकारी मैत्रीची नियुक्ती करेल जी महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देईल आणि या अधिकारांची अंमलबजावणी करण्यात मदत करेल.

५) केंद्र सरकार देशातील नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांची संख्या दुप्पट करणार असून, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतिगृह असेल.