बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी पुन्हा येणार महिंद्रा बोलेरो ! या खास फीचर्ससह लोकांना करणार वेडे…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahindra Bolero : भारतीयांच्या मनावर राज्य करणारी व महिंद्राची आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी ठरणारी कार महिंद्रा बोलेरो बाजारात पुन्हा एन्ट्री करणार आहे. मात्र यावेळी कारमध्ये खूप बदल होणार असून अनेक नवनवीन फीचर्ससह ही कार येणार आहे. यासाठी खरेदीदारांना 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

महिंद्राची बोलेरो ही एक अशी कार आहे जिने शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र लोकांना आवडते. खराब रस्त्यावर आरामदायी प्रवास देणारी महिंद्रा बोलेरो ही कार १० लाख रुपयांच्या एक्स-शोरूमसाठी उत्तम कार आहे. आता कंपनी आपले नवीन जनरेशन व्हर्जन आणणार आहे. सध्या कंपनी या प्लॅनवर काम करत असून त्याला U171 असे नाव देण्यात आले आहे. असा अंदाज आहे की ही भविष्यकालीन SUV ऑफ-रोडिंग आणि गुळगुळीत शहरातील दोन्ही रस्त्यांवर उच्च कार्यप्रदर्शन देण्यासाठी तयार केली जाईल आणि 2026 पर्यंत लॉन्च केली जाईल.

1493 cc च्या शक्तिशाली इंजिन

जर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या महिंद्रा बोलेरोबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये BS6 इंजिन उपलब्ध आहे. ही कार डिझेल इंजिनमध्ये दिली जात आहे. तर महिंद्रा बोलेरोमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.80 लाख रुपये आहे. महिंद्राची ही दमदार कार 1493 cc चे पॉवरफुल इंजिन देते. ही सात सीटर कार आहे, ज्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 10.81 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. सध्या कारच्या सुरक्षेसाठी GNCAP किंवा BNCAP ची कोणतीही क्रॅश चाचणी झालेली नाही.

बोलेरोचे तीन प्रकार B4, B6 आणि B6 (O)

महिंद्रा बोलेरो त्याच्या सेगमेंटमध्ये Hyundai Venue, Kia Sonet, Tata Nexon, Maruti Brezza आणि Maruti Frontx यांच्याशी स्पर्धा करते. यात उच्च पॉवरसाठी mHawk75 इंजिन आहे, जे रस्त्यावर 3600 rpm वर 75 bhp पॉवर आणि 2200 rpm वर 210 Nm टॉर्क देते. कारच्या पुढील बाजूस डॅशिंग ग्रिल आणि मोठे हेडलाइट्स उपलब्ध आहेत. हायस्पीडसाठी कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे.

हे तीन प्रकारांमध्ये येते ज्यामध्ये B4, B6 आणि B6 (O) असे प्रकार आहेत. यात पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, कीलेस एंट्री आणि चार्जिंग पोर्ट आहे. सध्या कंपनीची मोठ्या आकाराची SUV महिंद्रा बोलेरो निओ देखील बाजारात आहे. ही सात सीटर कार 9.64 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत येते. या कारमध्ये 1493 cc इंजिन आहे. यात डिझेल इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. सध्या उपलब्ध असणारी बोलेरो निओ या कारला देखील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.