Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर 65 हजारापर्यंत Discount; पहा कोणत्या मॉडेलवर किती सूट

mahindra cars discount offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्या भारतीय बाजारात खूप लोकप्रिय आहेत. महिंद्राच्या गाड्यांच्या चांगल्या कार्यक्षमतेमुळे लोकांची मोठी पसंती सातत्याने पाहायला मिळत आहे. आपल्या गाड्यांच्या विक्रीत आणखी वाढ व्हावी म्हणून महिंद्राने आपल्या काही निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर बंपर सवलत देण्यास सुरुवात केली आहे. या डिस्काउंट ऑफर अंतर्गत तुम्ही 65,000 पर्यंत पैशाची बचत करू शकता. मात्र कंपनीची ही ऑफर ३० जून २०२३ पर्यंतच आहे. चला आज आपण जाणून घेऊया महिंद्राच्या कोणत्या गाडीवर नेमका किती रुपयांचा डिस्काउंट आहे.

महिंद्रा थार (Mahindra Thar) – 65,000 रुपयांपर्यंत सूट

महिंद्रा थार हि कंपनीची सर्वात लोकप्रिय गाडी आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना अक्षरशः या गाडीने वेड लावलं आहे. महिंद्रा आपल्या या ऑफ रोड SUV च्या खरेदीवर तब्बल 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 40,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. परंतु कंपनीच्या LX 4X4 ऑटोमॅटिक व्हेरिएंटवरची तुम्हाला ही सवलत दिली जात आहे.

महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo) – 55,000 रुपयांपर्यंत सूट

महिंद्रा आपल्या बोलेरो निओ या कारवर 55,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत ​​आहे. या डिस्काउंट ऑफर अंतर्गत ग्राहकांना 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 25,000 रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.

Mahindra XUV300 – Rs 55,000 पर्यंत सूट

कंपनी तिच्या XUV300 च्या पेट्रोल व्हेरियंटवर 55,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये 30,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 25,000 रुपयांपर्यंतचे रोख लाभ समाविष्ट आहेत. यासोबतच महिंद्रा अँड महिंद्रा XUV300 च्या TurboSport या व्हेरियेण्टवर 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस ऑफरची सवलत देत आहे. येव्हडच नव्हे तर कंपनी यासोबतच वरील सर्व वाहनांच्या व्हेरियंटवर 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटही देत ​​आहे.