Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV

Mahindra Electric Cars
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Mahindra Electric Cars) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहन आता मार्केट मध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कार कंपनी महिंद्रा लवकरच आपल्या 5 नव्या इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करणार आहे. लंडनमधील एका मेगा इव्हेंट दरम्यान, महिंद्राने आपले नवीन इलेक्ट्रिक आर्किटेक्चर प्रदर्शित केले आहे, ज्यावर कंपनीच्या पाच इलेक्ट्रिक SUV कार आधारित असतील.

Mahindra Electric Cars

महिंद्राच्या या 5 इलेक्ट्रिक (Mahindra Electric Cars) कार दोन ब्रँड अंतर्गत लॉन्च केल्या जातील. या इलेक्ट्रिक गाड्यांची नावे XUV.E8, XUV.E9, BE.05, BE.07 आणि BE.09 अशी आहेत. या कार कंपनीच्या INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असतील. सर्वप्रथम XUV.E8 डिसेंबर 2024 पर्यंत लाँच केली जाईल तर BE श्रेणीतील पहिली कार BE.05 ऑक्टोबर 20225 पर्यंत लॉन्च करण्यात येईल. आणि त्यानंतर इतर इलेक्ट्रिक SUV लॉन्च केल्या जातील.

Mahindra Electric Cars

5-6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग- (Mahindra Electric Cars)

महिंद्राच्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी (Mahindra Electric Cars) क्षमता 60 – 80 kWh च्या दरम्यान असू शकते. तसेच या गाड्या 175 kW फास्ट चार्जिंगसह अवघ्या 30 मिनिटांतच 80 टक्के पर्यंत चार्ज होतील. याशिवाय या इलेक्ट्रिक SUV फक्त 5-6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग प्राप्त करतील.

Mahindra Electric Cars

महिंद्राच्या या सर्व SUV मध्ये (Mahindra Electric Cars) सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे नवीन हार्टकोअर डिझाइन . या कार कडे बघितल्यावर तुमची नजर हटणार सुद्धा नाही अशी या SUVची डिझाइन आणि लुक आकर्षक आहे. या सर्व नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑन द रोड आणि ऑफ द रोड इलेक्ट्रिक लूक देतील. गाड्यांच्या शानदार लुक बाबत बोलायचे झाले तर, नवीन SUV चे अत्याधुनिक cutting edge इंग्‍लो प्‍लॅटफॉर्मला आणखी नेत्रदीपक बनवते. या इलेक्ट्रिक कार म्हणजे महिंद्राच्या आर्किटेक्चरच्या बुद्धिमान आणि नाविन्यपूर्ण नवनवीन कल्पनांचा नजाराच असेल.