हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिंद्रा थार म्हणजे प्रत्येकाला हवीहवीशी गाडी… कोणत्याही रस्त्यावर आणि खडबडीत जागेवर बिन्दास्त मध्ये धावणारी ही SUV देशातील तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मजबूत इंजिन आणि तिच्या स्टाइलमुळे महिंद्रा थार लोकांच्या काळजातच बसली आहे. गेल्या काही वर्षांत महिंद्र थारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. तुम्ही सुद्धा ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा दुसरी योग्य वेळ नाही. कारण कंपनी आपल्या नवीन थारवर 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत.
तुम्ही जर महिंद्राची थार 4X4 पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी गेलात तर कंपनीकडून तुम्हांला 40,000 रुपयांची रोख सूट आणि 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. हा एक्सचेंज बोनस काही इतर व्हेरियन्त वरही दिला जात आहे. मात्र प्रत्येक शोरूम मध्ये हा एक्सचेंज बोनस वेगवेगळा असू शकतो.
महिंद्रा थारचे इंजिन –
महिंद्राची फोर व्हील ड्राइव्ह ऑफ रोड एसयूव्ही मध्ये 2.0-लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2-लीटर KMhawk डिझेल इंजिन देण्यात आलं आहे . हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक युनिट्ससह जोडलेले आहे. तसेच या एसयूव्हीच्या रिअर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते जे 6-स्पीड मॅन्युअल इंजिनशी जोडलेले आहे.
किंमत किती?
Mahindra thar च्या किमती तिच्या व्हेरिएन्टनुसार वेगवेगळ्या आहेत. बेस व्हेरिएन्टची किंमत 9.99 लाख पासून असून टॉप व्हेरियेण्टसाठी तुम्हांला 16.49 लाख रुपये मोजावे लागतील. कंपनी सध्या येत्या काही महिन्यांत भारतात नवीन 5-डोर थार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.