महिंद्राचा धमाका ! 2024 मध्ये लॉन्च करणार 5 डोअर थार ते इलेक्ट्रिक XUV.E8 पर्यंतच्या शक्तिशाली कार्स; किंमत असेल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Upcoming Cars 2024 : सध्या नववर्ष म्हणजेच 2024 सुरु होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. अशा वेळी नववर्षात कार खरेदी करण्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नवीन वर्षात महिंद्रा बाजारात अनेक शक्तिशाली कार्स लॉन्च करणार आहे. महिंद्राने अद्याप नवीन कारच्या पॉवरट्रेनमधील कोणत्याही बदलांची माहिती शेअर केलेली नाही.

मात्र कंपणी 2024 मध्ये बाजरात, Mahindra Thar 5 डोअर, Mahindra XUV.e8 इलेक्ट्रिक कार आणि Mahindra XUV300 ची नवीन अपडेटेड आवृत्ती आणणार आहे. अशा वेळी सध्या बाजारात असलेली महिंद्रा थार लोकांना मोठ्या प्रमाणात पसंत पडली आहे. आणि आता कंपनी नवीन ५ डोअर कार आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लोक या कारसाठी खूप उत्सुक आहेत. तसेच कंपनी 2024 मध्ये Mahindra XUV400 EV चे नवीन अपडेटेड व्हर्जन आणणार आहे. हेडलाइट्स, फ्रंट लूक ग्रिल आणि मागील लाइट्स यासारख्या नवीन कारच्या बाह्य डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

महिंद्रा थार 5 डोअर

कंपनीने या नवीन थारचा बॉक्सी लूक आहे. स्टायलिश मस्क्युलर लूकसह, महिंद्रा थार 5-डोरला 18-इंच टायर मिळतील. यात 2.0-लिटर टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर टर्बो चार्ज केलेले डिझेल इंजिनचा पर्याय असेल. ही SUV 2 व्हील ड्राइव्ह आणि 4×4 ट्रान्समिशनमध्ये दिली जाईल. सध्या या कारची प्रोडक्शन व्हर्जन रस्त्यांवरील चाचणीदरम्यान दिसली आहे. ही एसयूव्ही रस्त्यावरील जीप रँग्लरशी स्पर्धा करेल. कंपनीने त्याची लॉन्च तारीख निश्चित केलेली नाही. मात्र 2024 च्या मध्यापर्यंत ते सादर केले जावे असा अंदाज आहे.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

सध्याच्या XUV300 नंतर आता कंपनी याचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात घेऊन येणार आहे. या नवीन कारच्या पुढील आणि मागील लूकमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन कारमध्ये प्रोजेक्टर लाइट्ससह स्टायलिश हेडलाइट्स असतील. कारला सुरक्षेसाठी 17 इंच टायर असतील. ही कार 2024 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केली जाईल. ही मिड सेगमेंट SUV कार 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येईल. हे इंजिन 109 bhp पॉवर आणि 210 Nm टॉर्क जनरेट करेल.

महिंद्रा XUV.e8

यात 60 kWh आणि 80 kWh अशा दोन बॅटरी पॅकचा पर्याय असेल. ही कार एका चार्जवर 450 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. कारची सुरुवातीची किंमत 35 ते 40 लाख रुपये एक्स-शोरूम असण्याची शक्यता आहे. या कारमध्ये अतिरिक्त वीज मिळावी यासाठी दोन मोटर बसविण्यात येत आहेत. तसेच या मोठ्या आकाराच्या एसयूव्ही कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हिल होल्ड असिस्ट आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम असेल. चाहत्यांसाठी ही कार नवीन वर्षात येण्यासाठी सज्ज आहे.