म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात ; भाजप आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पाणीपूजन

सोलापूर | केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं पाणी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात पोचले आहे. पाणी आल्यानंतर भाजपचे आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांनी पाणी पूजन केले.

1992 पासून बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मंत्री नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यातील एकूण 07 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश करण्यात आला होता.

या योजनेसाठी पंतप्रधानांनी अंदाजे 3000 हजार कोटी रुपये मंजुर केले होते. योजनेतून मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडण्यात आले. समाधान आवताडे आमदार झाल्यानंतर फक्त 15 दिवसात पाण्याचा प्रश्न सोडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

You might also like