एसटी -दुचाकी अपघातात एकजण ठार तर लहान मुलगी जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | वाठार (ता. कराड) येथे एसटी बस दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, तर एक लहान मुलगी जखमी झाली. कराड-कासारशिरंबे एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. याप्रकरणी एसटी बस चालक सयाजी हिंदुराव यादव (वय 53) रा. अतित ता. जि. सातारा यांनी दुचाकी चालकाविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरव अनिल जाधव (रा. अतित ता. जि. सातारा) असे अपघातात ठार झाल्याचे नाव आहे. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली मुलीगी (नाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड-कासारशिरंबे एसटी बस कराडवरून कासारशिरंबेकडे जाताना वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत एसटी बस चालक सयाजी यादव हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस महामार्गावरून सेवा रस्त्यावर घेताना पाठीमागून

आलेल्या दुचाकीने एसटी बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर एसटी बसचालक यादव यांनी बस बाजूला उभी करून खाली उतरुन पाहिले असता त्यांना दुचाकीसह दुचाकी चालक व त्याच्या पाठीमागे बसलेली मुलगी रस्त्यावर पडलेली दिसली. दुचाकी चालकच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. तसेच त्यांच्या डाव्या पायाला मोठी जखम झाली असल्याचे दिसून आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरु असताना दुचाकी चालक सौरव जाधव याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी एसटी बस चालक सयाजी हिंदुराव यादव यांनी दुचाकी चालक सौरव जाधव याने त्यांच्या ताब्यातील दुचाकी हयगयीने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून माझ्या एसटी बसला धडक दिली. त्याच्या स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे माझी मयत दुचाकी चालकाविरोधात फिर्याद आहे. असे एसटी बस चालक सयाजी यादव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दुचाकी चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment