घर बसल्या १० मिनिटांत बनवून घ्या पॅन कार्ड; वित्त मंत्रालयाने लॉन्च केली ‘हि’ नवी सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी रियल टाइम बेसिसवर पॅन कार्ड वाटप करण्याची सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी याबाबत माहिती दिली. सीबीडीटीने सांगितले की,’ ही सुविधा ज्या अर्जदारांसाठी वैध आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आधारकडे रजिस्टर्ड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

या सुविधेसाठीचे बीटा वर्जन याआधीच १२ फेब्रुवारी २०२० रोजी सुरु केले गेले. इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर ट्रायल बेसिसवर ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पण, आता हे अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. पॅन वाटप करण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असेल आणि अर्जदारांना इलेक्ट्रॉनिक पॅन विनाशुल्क देण्यात येईल. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार इन्कम टॅक्स विभागाने डिजिटल इंडिया अंतर्गत इन्स्टंट पॅनची सुविधा सुरू केली आहे. यानंतर आता करदात्यांना ही प्रक्रिया हाताळणे अधिक सोपे होईल.

 

१. तुम्हाला पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या e-Filing पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आपल्याला “Instant PAN through Aadhaar” सेक्शन मध्ये जावे लागेल आणि डाव्या बाजूला असलेल्या “Quick Links” वर क्लिक करावे लागेल.

२. या पानावर तुम्हाला “Get New PAN” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

३. येथे क्लिक केल्यानंतर, तुमचा आधार नंबर द्यावा लागेल आणि ओटीपी जनरेट करण्यासाठी कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल, जो आपल्याला वॅलिडेट करावा लागेल.

४. पुढील स्टेपमध्ये आपल्याला आधार डिटेल्स वॅलिडेट करावा लागेल.

५. पॅनकार्ड आवेदनासाठी तुम्हाला E-mail ID देखील वॅलिडेट करावा लागेल.

६. युनिक आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून e-KYC डेटा वॅलिडेट केल्यावर तुम्हाला इन्स्टंट पॅन देण्यात येईल. एकूणच, या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला १० मिनिटेदेखील देण्याची गरज नाही.

७. पुढील स्टेपमध्ये, “Check Status/ Download PAN” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण आपले पॅन कार्ड PDF फॉरमॅट मध्ये सहजपणे डाउनलोड करू शकाल. जर तुमचा E-mail ID तुमच्या आधार डाटाबेसमध्ये रजिस्टर असेल तर तुम्हाला E-mail वर नवीन e-PAN ही पाठवला जाईल.

या गोष्टी लक्षात ठेवा
हे लक्षात घेण्यासारखे आहे की याद्वारे ज्या लोकांकडे पॅन कार्ड नाही आहे अशाहा लोकांना पॅन कार्ड दिले जाईल. तसेच त्यांचा मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक केलेला असावा. आधार कार्डवर जन्मतारीख देखील उपलब्ध असावी हे देखील लक्षात घ्यावे. याशिवाय e-PAN सुविधा ही अल्पवयीन मुलांसाठी नसल्याचेही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment