असे बनवा मक्याच्या कणसाचे पराठे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | मक्याच्या कणसाच्या दाण्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे ,

साहित्य – अर्धी वाटी मक्‍याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल.

कृती – बटाटा किसून घ्यावा. कणसाचे दाणे अगदी मऊ वाटावेत. मग दोन्ही एकत्र करून त्यात तिळकूट, तिखट, मीठ व तेलाचे मोहन घालून या मिश्रणात मावेल तेवढी कणीक घालून मध्यम आकाराचे पराठे करावेत. दोन्ही बाजूंनी तेल सोडावे. तांबूस भाजावेत. लोणी किंवा तूप आणि आंब्याच्या लोणच्याबरोबर खाण्यास द्यावेत.

Leave a Comment