हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असताना आता काँग्रेसच्या बैठकीतून नाना पटोले (Nana Patole) यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं असा सूर उमटला आहे. नाना पटोले याना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊन असं म्हणत काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी इशारा दिला आहे. नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विदर्भाचे सहप्रभारी कुणाल चौधरी, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. नितीन राऊत, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विकास ठाकरे (Vikas Thackeray) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदा सारखं महत्वाचे पद सोडून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं, मेहनत केली. आपलं घरदार सोडून ते जनतेच्या दारात गेले आणि काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस त्यांनी दाखवले. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळालाच पाहिजे. तो मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ. वेळ पडली तर नाना पटोले यांच्यासाठी लढाई लढू.
दरम्यान, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं कि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो हायकमांड घेईल. आमच्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या विषयापेक्षा महाराष्ट्र लुटण्याचे आणि गुजरात धार्जिणे करण्याचे काम भाजप करतंय ते विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही असं म्हणत नाना पटोले यांनी अधिक बोलणं टाळलं. तर दुसरीकडे असे काही उत्साही कार्यकर्त्ये असतात, ते काही मानण्याचे कारण नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली