वाल्मिक कराडला मोठा धक्का!! मकोका लावत कोर्टाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

walmik karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, देशमुख कुटुंबाने कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी काल जोरदार आंदोलन केले.

दुसऱ्या बाजूला कराड यांच्या सीआयडी कोठडीचा कालावधी संपल्यानंतर त्यांना आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीत कराड यांच्यावर न्यायलयाने मकोका लावला आहे. या कारवाईनंतर सीआडीकडून कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सीआयडीने कराडची चौकशी करण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी अर्जात केली आहे.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत अनेक भागांत निदर्शने करण्यात आली आहेत. यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती पाहता प्रशासनाने 28 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. सध्या या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात तणाव वाढत चालला आहे. यात प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत.