रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? तर मग आज मलाई कोफ्ता करी ट्राय करा

malai kopta Maharashtrian food recipes
malai kopta Maharashtrian food recipes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Recipe | जिभेला तृप्त करून सोडणारी कोणती भाजी असेल तर ती म्हणजे मलाई कोफ्ता करी. या भाजीचा संबंध जास्त दुधाशी येतो म्हणून याला मलाई कोफ्ता असे नाव देण्यात आले असावे. चला तर बघूया कशी बनवायची मलाई कोफ्ता करी.

मलाई कोफ्ता करीसाठी लागणारे साहित्य
१.पनीर -५० ग्रॅम
२.उकडलेले मोठे बटाटे – ५ नग
३.पाव वाटी कॉर्नफ्लॉवर ग्रेव्ही
४.हिरव्या मिरच्या
५.बेदाणे – १०ग्रॅम
६.चीजचा क्यूब
७.दोन कांदे
८.एक वाटी भाजलेले शेंगदाणे
९.दुधाची साय एक वाटी
१०.आले लसूण पेस्ट
११.२५ग्रॅम बदाम
१२.लवंग ६,वेलदोडे ४,दालचिनीचा तुकडा,जायफळ पूड चुमुटभर,मिरपूड,मीठ,हळद.
१२.फोडणीला तूप

कृती –

उकडलेल्या बटाट्याची साल काढून एका भांड्यात ते चुरून घ्यावेत. त्यात चीज आणि पनीर खिसून टाकावे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. कॉर्नफ्लॉवर घालून ते मिश्रण चांगले मळावे. त्याचे गोलाकार गोळे करावे त्यात बदाम घालून तेलात तळावे. लवंग ६, वेलदोडे ४, दालचिनीचा तुकडा, जायफळ पूड चुमुटभर, मिरपूड यांचा मिक्सरमध्ये बारीक मसाला करून घ्यावा. तापलेल्या तुपावर बारीक केलेला मसाला घालावा. आले लसूण पेस्ट, दुधाची साय दही घालून मंद आचेवर सर्व परतून घ्यावे. शेवटी तळलेले कोफ्ते टाकून चवी नुसार मीठ टाकावे. मंद आचेवर भाजी शिजवून पानात वाढावी.

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.