Saturday, March 25, 2023

ग्लोइंग स्किनसाठी टीप्स देणारी मलायका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडविली वयाची खिल्ली

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. या फोटोंतून ती नेहमीच इतरांना प्रेरणा देत असते. मात्र त्वचेबाबतही मलायका तितकीच काळजी घेताना दिसते. तिचा नुकताच एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे ज्यात ती चेहऱ्याला बर्फ लावताना दिसत आहे आणि सोबतच ग्लोइंग स्किनसाठी काही टिप्स देताना दिसत आहे. मात्र मलायकाने शेअर केलेला फोटो फिल्टर लावलेला आहे. यामुळे चाहत्यांनी तिची खिल्ली उडवायचा सुरुवात केली. ग्लोइंग स्किन दाखवण्याआधी फिल्टर तरी काढ अशा आशयाच्या कमेंट्स तिच्या या व्हिडिओवर येत आहे.

- Advertisement -

अनेकांनी तिच्या वयाची अतिशय खिल्ली उडविली आहे. तर कुणी तिला आधी फिल्टर तरी काढ असा सल्ला दिला आहे. अन्य एकाने तर हा सगळं सर्जरीचा कमल आहे, पब्लिक खुली नाही अशी देखील कमेंट केली आहे.

तसे पाहाल तर, वयाची चाळीशी ओलांडल्या नंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून अनेकांची बोलती बंद नाही झाली तर नवलच. तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अत्यंत ट्रेंडिंग असतात. यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा नेहमीच वर्षाव होत असतो. तिने ४७ वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला होता. अगदी काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते.

काही दिवसांपूर्वी मलायकाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे तिचे वनजही वाढले होते. मात्र कोरोनामुक्त झाल्यावर तिने वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. कोरोना काळातला अनुभव देखील तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहीले की, दोन पावले चालणे देखील कोणत्या टास्कपेक्षा कमी नव्हते.

फक्त अंथरुणातून उठून बसणे आणि खिडकीत उभे पाहणे हा एक प्रवास होता. माझे वजन वाढले, मला अशक्त वाटत होते माझी सहनशक्ती संपली होती. मी कुटुंबापासून दुरावली होती आणि बरेच काही घडले. त्याचदरम्यान जमेल तसे वर्कआऊट करत गेले आणि शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा एकदा पुर्वीसारखेच फिट वाटत असल्याचे तिने सांगितले.