मलेशियाने बनवले जगातील पहिले Unisex कंडोम, वापरले ‘हे’ मटेरियल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

क्वालालंपुर । मलेशियातील एका शास्त्रज्ञाने जगातील पहिला युनिसेक्स कंडोम तयार केला आहे. हा युनिसेक्स कंडोम स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. हा कंडोम मलेशियाच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी मेडिकल ग्रेड मटेरिअलपासून बनवला आहे, हे कंडोम सर्जिकल जखमांच्या ड्रेसिंगसाठी वापरले जाते.

युनिसेक्स कंडोम बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की,’यामुळे लोकांचे लैंगिक आरोग्य सुधारेल. या युनिसेक्स कंडोमचा पुरुष आणि महिला दोघांनाही फायदा होईल. युनिसेक्स कंडोम एका बाजूला चिकटलेले असतात.’

ट्विन कॅटॅलिस्ट फर्मचे Gynaecologist जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले की,”हे युनिसेक्स कंडोम इतर नियमित कंडोमसारखेच आहेत. फक्त ते पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरू शकतील. या युनिसेक्स कंडोममध्ये नियमित कंडोमपेक्षा जास्त संरक्षण असते.”

Wondaleaf युनिसेक्स कंडोमच्या प्रत्येक पॅकेटमध्ये दोन कंडोम असतील आणि त्याची किंमत 14.99 रिंगिट म्हणजे सुमारे 270 रुपये असेल. मलेशियामध्ये 20-40 रिंगिटमध्ये डझनभर कंडोम खरेदी केले जाऊ शकतात.

Gynaecologist नी Polyurethane पासून हे युनिसेक्स कंडोम बनवले आहेत. हे मटेरियल पारदर्शक आहे. Polyurethane मटेरियल अतिशय पातळ आणि लवचिक आहे. ते मजबूत आणि वाटरप्रूफ आहे.

हा युनिसेक्स कंडोम इतका पातळ आहे की, तुम्ही तो कधी घातला हे कळणारही नाही, असा दावा जॉन टॅंग इंग चिन यांनी केला आहे. हे ड्रेसिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मटेरियल पासून बनविले जाते.

Gynaecologist जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले की,”अनेक क्लिनिकल रिसर्च आणि टेस्टिंगनंतर हे युनिसेक्स कंडोम तयार करण्यात आले आहेत. हे युनिसेक्स कंडोम डिसेंबरपासून फर्मच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.”

Leave a Comment