कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाणे आज बुधवार दि. 1 सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठाण्यातंर्गत 52 गावांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
पाटण तालुक्यातील वाढती लोकसंख्या, गावांचा होत असलेला विस्तार आणि त्या प्रमाणात अपुरी पडत असलेली पोलीस यंत्रणा यामुळे मल्हारपेठ येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यास शासनाने दि. 7 ऑक्टोंबर 2020 रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार सातारा पोलीस मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रची जुनी इमारत पाडून याठिकाणी उभ्या राहत असलेल्या पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे सध्या वेगाने आहे. नव्याने निर्माण पोलीस ठाण्याचा कारभार बुधवार पासून सुरु होत.
या पोलिस ठाण्यात 1 सहायक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, 3 सहायक पोलीस उपनिरीक्षक, 4 पोलीस हवालदार, 7 पोलीस नाईक, 14 पोलीस शिपाई असे 30 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्य बळ देण्यात आले आहे. नवीन मल्हारपेठ पोलीस ठाण्याची अधिसूचना निर्गमित करण्यात असून या पालीस ठाण्या अंतर्गत गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. दि. 1 सप्टेंबर रोजी पासून मल्हारपेठ पोलीस ठाणे कार्यान्वित होत आहे. या पोलीस ठाणे निर्मितीबाबत आदेश निर्गमित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी त्या अनुषंगाने बाबीची पूर्तता केली आहे.