मलकापूर नगरपंचायत निवडणूक निकाल : कॉंग्रेस ला बहुमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी निर्णायक समजल्या जाणार्या मलकापूर नगरपंचायत निवडणूकित कॉंग्रेस ने बाजी मारली आहे. एकूण १९ जागांपैकी १४ जागांवर कॉंग्रेस चे उमेदवार निवडून आले आहेत तर पाच जागांवर भाजप चे उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदी कॉंग्रेस च्या नीलम येडगे विजयी झाल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले जाणारे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे दोघांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती.

दरम्यान, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असलेली ही निवडणूक म्हणजे कराड मतदारसंघातील रंगीत तालीमच समजली जाते आहे. तसेच सदर निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले हे दोघे ही नेते कराडमध्येच ठाण मांडून बसले होते. एकूण ९ प्रभागात १९ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्ष पदासाठी २ उमेदवार रिंगणात होते.

 उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक १ काँग्रेसच्या गीतांजली पाटील आणि प्रशांत चांदे 

प्रभाग क्रमांक २ भाजपच्या नूरजहाँ मुल्ला आणि विक्रम चव्हाण

प्रभाग क्रमांक ३ काँग्रेसचे किशोर एडगे आणि आनंदी शिंदे 

प्रभाग क्रमांक ४ काँग्रेसचे राजेंद्र यादव विजयी

प्रभाग क्रमांक ५ काँग्रेसचे कमल आनंदराव कुराडे आणि भाजपच्या भास्कर सोळवंडे

 

Leave a Comment