मलकापूर येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी

मलकापूर येथील वारणा हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दा फाश केला आहे. यामध्ये दोन महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले असून एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार दि.30 जून रोजी सायंकाळी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मलकापूर येथील वारणा हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यांनी एक पथक नेमून हॉटेलवर सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांना या छाप्यात दोन ग्राहक दोन महिला सापडल्या. पोलिसांनी यांच्यासह हॉटेलच्या मॅनेजर व रूम बॉयला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी हॉटेल मालक बिलाल पठाण, मॅनेजर प्रमोद नंदकुमार सातपुते, रुमबॉय विनायक ज्ञानदेव पाटील व एक महिला अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मलकापूर शहरात पुणे- बँगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर टाकलेल्या छाप्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड

या गोष्टी करा आणि पार्टनर सोबतच्या नात्यात गोडवा आणा

शेतकरी भगिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा तो अधिकारी असंवेदनशील आणि शेतकरीद्वेश्या सरकारचा प्रतिनिधी – जयंत पाटील

साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण

अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेना आमदार क्षीरसागरांनी दिले पोलीस अधिक्षकांना निवेदन

Leave a Comment