वेरुळ येथील मालोजी राजे भोसले गढीला मिळणार नवसंजीवनी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

औरंगाबाद – जागतिक वारसा लाभलेल्या वेरुळ येथील मालोजी राजे भोसले गढी व शहाजी राजे स्मारक परिसराची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी पाहणी केली असून वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी एैतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना येथे येण्याची संधी उपलबध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत स्थनिक प्रशासनास सूचना केल्या.

वेरुळ येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्कींग, बसण्यासाठी बाकडे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छातागृह तसेच आवारात स्थित हॉलमध्ये विविध चित्र प्रदर्शनातून एैतिहासिक घटनाधारित सांगणारा चित्र प्रदर्शन तयार करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.