मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी, मी तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते; ममतादिदींचे भाजपला चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशभर चर्चेत असून ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगत आहे. दरम्यान या निवडणुकीत आता धार्मिक रंग चढले आहेत. दरम्यान भाजपच्या हिंदुत्त्वाला ममता दीदींनी देखील त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, हे मला मला हिंदू धर्म शिकवत आहेत. मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते. माझ्यासाठी सर्व समान आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक समान आहेत, मी लोकांमध्ये भेदभाव करणार नाही. मला आई-वडिलांनी भेदभाव करायला शिकवलं नाही. अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

दरम्यान यावेळी ममता यांनी भाजपचा डाकू असा उल्लेख केलाय. नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सर्व काही विक्री काढत आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत. जर दंगा करतील तर माझ्यात पंगा घेण्याची ताकद आहे”, अशा शब्दात ममता यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like