Mamata Banerjee Letter To PM Modi : बलात्काराविरोधात कडक कायदा करा; ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Mamata Banerjee Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून देशात बलात्कार (Rape Cases In India) आणि हत्येचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र पाठवून याबाबतची गंभीर परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांविरोधातील वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी कडक केंद्रीय कायदा आणण्याची गरज आहे असेही ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात म्हंटल.

पत्रात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पत्रात लिहिले आहे की,आदरणीय पंतप्रधान, मला संपूर्ण देशात बलात्काराच्या वाढत्या घटनांकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. यातील अनेक घटनांमध्ये बलात्कारासोबतच खूनही केला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात दररोज सुमारे 90- 90 बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे समाज आणि राष्ट्राचा आत्मविश्वास आणि विवेक डळमळीत होतो. अशा गोष्टी थांबवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल. अशा गंभीर आणि संवेदनशील विषयावर तातडीने पावले उचलण्याची आणि गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा देण्याची गरज आहे . यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेला कठोर केंद्रीय कायदा केला पाहिजे. प्रस्तावित कायद्यात अशा प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी फास्ट्रक्ट न्यायालये स्थापन करण्याचाही विचार केला पाहिजे. अशा प्रकरणांची सुनावणी 15 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे असं ममता बॅनर्जी यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात म्हंटल आहे.

दरम्यान, बलात्काराच्या घटना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षांच्या २ चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली. यानंतर नागपूर येथे शेजारी राहणाऱ्या माणसाने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केले. कोल्हापुरात सुद्धा १० वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या एकूण सर्व घटनांनी महाराष्ट्र सुद्धा हादरला आहे. सरकारने कडक कायदे करून अशा नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येतेय.