ममता बॅनर्जी मुंबईत येणार; पवार-ठाकरेंच्या भेटी घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बॅनर्जी मुंबईतच राहणार आहेत.

खरं म्हणजे मुख्यमंत्री बॅनर्जी या बंगाल ग्लोबल बिझनेस समीटसाठी ३० नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. त्या ३० आणि १ नोव्हेंबर असे दोन दिवस मुंबईत असतील. मुंबई भेट ही बिझनेस समिटसाठी असल्याचं त्या म्हणाल्या असल्या तरी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार हे नक्की.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. त्यामुळे पवार आणि ठाकरे यांना भेटून आगामी राजकीय घडामोडीवर चर्चा होऊ शकते. तसेच देशात भाजपला आव्हान देण्यासाठी रणनीती ठरू शकते. शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत असतात. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी याना शिवसेनेकडून आगामी निवडणूकात सहकार्य मिळू शकत.

You might also like