ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडणार आहे. ममता बॅनर्जी आज रात्री ७ वाजता राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर ते ५ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेद्वारे हि माहिती दिली आहे.

You might also like