कोलकाता | लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मजबुरीचे गठबंधन’ या टीकेला उत्तर म्हणून आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांचे शक्तिप्रदर्शन तृणमूल काँग्रेसने कोलकाता येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. दरम्यान समाज माध्यमावर प्रसारित होत असलेल्या या राजकीय ‘अतिथी देवो भव’चा संकेत देत असलेल्या फोटोने धुमाकूळ घातला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी स्वतः नेत्यांना खाद्यपदार्थ वाढत असल्याचे या चित्रातून स्पष्ट होते. महामेळाव्याचे सूत्रसंचालनही बऱ्याच प्रमाणात केल्याचे पाहायला मिळाले. परंतु मेळाव्यात ना राहुल गांधी ना सोनिया गांधी दिसल्या. म्हणून हा फोटो बरच काही सांगून जात असल्याची चर्चा लोकांमध्ये चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नेमके काय गणित होत आहेत ते पहायला मिळेलच.
या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन, भाजपाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा उपस्थित आहेत.
याशिवाय, बसपाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह, माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी, यशवंत सिन्हा, गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवानीदेखील मेळाव्यात हजर आहेत.