निवडणूक आयोगाने मदत केली नसती तर भाजपने 50 चा आकडाही गाठला नसता – ममता बॅनर्जी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि पर्यायाने मोदी-शहा या जोडगोळीला जोरदार धक्का देत ममता बॅनर्जी यांनी आपला पश्चिम बंगालचा गड पुन्हा एकदा राखला आहे. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी हार न मानता ही लढाई लढली आणि त्या जिंकल्या देखील. या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं काम केलं. यावेळी आयोग ज्या पद्धतीने वागला, ते सगळं भयंकर होतं,” असं म्हणत ममतांनी टीकास्त्र डागलं.

इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केले. तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन छेडछाड केलेल्या होत्या. आणि असंख्य पोस्टल बॅलेट रद्द करण्यात आले. पण, मी पश्चिम बंगाल माणसांना सलाम करते. त्यांनी फक्त बंगाललाच वाचवलं नाही, तर देशालासुद्धा वाचवलं आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने खूप जोर लावला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचाराला उतरले होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी जोरदारपणे या सर्वांचा सामना करत भाजपला अस्मान दाखवले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment