हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसान झालेल्या फळबागा व पिकांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. त्यांच्या तीन तासांच्या पाहणी दौऱ्यावरून आता भाजपच्या नेत्यांकडून टीकास्त्र डागले जात आहे. त्यांच्या दौऱ्यावरून भाजपचे भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी पुन्हा टोला लगावला आहे. “जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.” असा ट्विट राणेंनी केलं आहे.
कोकणातील पाहणी दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर आता भाजपचे भाजपचे प्रदेश सचिव नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या ठिकाणचा दौरा म्हणजे फक्त फोटोबाजीसाठीचा आहे'” अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तरही दिले. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधण्याचे काम भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी केले आहे.
ते आले… अन् न पाहताच निघून गेले,
मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द.
जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “ते आले… अन् न पाहताच निघून गेले, मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द. जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.,” असा ट्विट करीत मुख्यमत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे.