रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तर ट्रेनला प्रथम प्राधान्य दिले जाते. रेल्वेकडून जेवणाची सोया सुद्धा केली जाते. मात्र अनेकदा रेल्वेतील जेवणाबद्दल तक्रारी समोर येताना पाहायला मिळतात. कधी झुरळ कधी आळी असे प्रकार तुम्ही अनेकदा ऐकले असतील मात्र आता एक ताजी घटना समोर आली आहे ज्यामध्ये रेल्वेच्या जेवणात चक्क जिवंत गोम आढळली आहे. गोम हा प्राणी पाहताच कुणीही लांब पाळायला लगेल. मात्र रेल्वेने दिलेल्या जेवणातील रायत्यामध्ये चक्क जिवंत गोम आढळली आहे. या बाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण ?
त्याचे काय झाले ? की आर्यांश सिंग आयआरसीटीसी व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये जेवण करत असताना त्याच्या रायत्यात एक गोम तरंगताना दिसली . त्याने एक फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. “होय, नक्कीच, भारतीय रेल्वेच्या अन्नाचा दर्जा सुधारला आहे, आता ते उच्च प्रथिने असलेला रायते देत आहेत,” अशा आशयाची मजेशीर कमेंट आर्यांशने लिहिली आहे. फॉलो-अप पोस्टमध्ये, त्याने सांगितले की इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे चालवल्या जाणाऱ्या व्हीआयपी लाउंजमध्ये जेवताना त्याला त्याच्या अन्नात गोम आढळली.
Yes, for sure, Indian Railway food quality has improved, now they are serving raita with more protein. https://t.co/YKtUQt7roZ pic.twitter.com/FpJVIKOhBC
— Aaraynsh (@aaraynsh) October 21, 2024
यूजर्सही या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. IRCTC ने देखील त्याच्या अधिकृत X हँडलवरून त्याला उत्तर देताना लिहिले की, सर, गैरसोयीबद्दल क्षमस्व. कृपया तात्काळ कारवाईसाठी पावती/बुकिंग तपशील, स्टेशनचे नाव आणि मोबाईल नंबर शेअर करा.