विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संबलपूर : वृत्तसंस्था – एका महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडलेल्या एका युवकाने त्याचे प्रपोजल नाकारल्यानंतर आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन हा एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या प्रेमात होता आणि त्याने तिला अनेक वेळा प्रपोजसुद्धा केले होते. मात्र, ती महिला विवाहित होती, तरीही तो 2012 पासून तिचा पाठलाग करत होता. यादरम्यान महिला वाहतूक पोलिसाने त्याच्याविरोधात स्थानिक पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारदेखील केली होती. यानंतर संतापलेल्या नवीनने त्या महिलेचा पाठलाग केला आणि तिला पुन्हा प्रोपोज केले त्यावेळी पुन्हा या महिलेने त्याला नकार दिला.

यानंतर नवीनने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले. यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना विमसार,बुर्ला येथे पाठवण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान महिला कॉन्स्टेबलने मंगळवारी पोलिसांशी संपर्क साधून त्याच्याविरोधात पाठलाग केल्याची लेखी तक्रार दाखल केली होती.