प्रेमात होकार मिळवण्यासाठी तरुणाने चक्क पोलिसांना मागितली मदत ; पुणे पोलिस आयुक्तांनी दिला ‘हा’ जोरदार रिप्लाय

amitabh gupta
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना काही समस्या असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी ट्विटर माध्यमातून स्परस्पर संवाद साधण्याचा कार्यक्रम घेतला. त्यावेळी एका तरूणाने त्यांना गळ घातली की, त्याचे एका मैत्रिणीवर प्रेम आहे. तिला प्रपोज करणार असून तिच्याकडून होकार मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याची मदत करावी. त्यावर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या उत्तराने समाजमाध्यमावरती नेटकऱ्यांचे मन जिंकले आहेत.

तरुणाने थेट पोलीस आयुक्तांना ट्विट करून, मैत्रिणीला प्रपोज करण्याचा उल्लेख करत, होकार मिळवण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. त्यावर तो प्रश्न न टाळता पोलीस आयुक्तांनी या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी उत्तरामध्ये, मुलीच्या इच्छेविरुद्ध काहीच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. सोबत ते म्हणाले की, दुर्दैवाने मुलीच्या इच्छे विरोधात आम्ही देखील काही करू शकत नाही. आणि तिच्या इच्छेविरुद्ध त्याने देखील काहीही करू नये. भविष्यात मुलीने तयारी दाखवली तर त्यासाठी आमच्याकडून तुला शुभेच्छा आहेत’. असा सल्ला त्यांनी तरुणाला दिला.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी #ANoMeansNo हा हेस्टॅक वापरला. या ट्विटरवर वेगवेगळ्या सामाजिक माध्यमवरती अनेक चर्चा झाल्या. बहुतांशी लोकांनी याचे समर्थन केले. तर, काही लोकांनी याचा विरोध करून, पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या समस्या असून तिकडे लक्ष द्यावे असा रिप्लाय केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’