Saturday, March 25, 2023

आमच्या नादाला लागू नका, महागात पडेल; मनसेचे नेते बाळा नांदगावकरांचा इम्तियाज जलील यांना इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉटरी लागल्यामुळे तुम्ही खासदार झालात हे लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंच्या नादी लागायचं नाही, पाहिजे असेल तर अबू आझमीला विचारा, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकरांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना दिला आहे. आमच्या नादाला लागू नका, महागात पडेल, असेही बाळा नांदगावकर म्हणाले. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

मनसेच्या महाअधिवेशनातील भाषणावर जलील यांनी जोरदार टीका केली होती . मशिदीवरील भोंग्यांचा तुमच्या कानाला आताच त्रास झाला का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच आतापर्यंत आम्ही अनेकांना शिंगावर घेतले आहे, असे म्हणत त्यांनी मनसेला डिवचले होते.

नांदगावकर म्हणाले, तुमचे ओवेसी औरंगाबादला नाचले, त्यांना आम्ही नाचा बोलू का, कृपया आमच्या नादाला लागू नका, खूप महागात पडेल, आलात हैद्राबादवरुन तर हैद्राबादमध्येच रहा, राज ठाकरे यांच्या विषयी परत जरा बोललात तर ते तुम्हाला महागात पडेल.