पोटनिवडणुकीत ममतादीदींची बाजी; कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानं ममता बॅनर्जी यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात उपस्थिती दाखवली होती. तसंच विरोधकांना एकत्र आणण्याच्या कामातही त्या लागल्या होत्या. इतकंच नाही तर गोव्यासारख्या राज्यातही आता तृणमूल काँग्रेसनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Comment