IPL मुळे मँचेस्टर कसोटी रद्द झाली नाही, ECB प्रमुखांनी वादानंतर दिले स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची 5 वी आणि शेवटची कसोटी प्रसंगी रद्द करण्यात आली. याविषयी वादही तेव्हा निर्माण झाला जेव्हा काही रिपोर्ट्समध्ये दावा केला की, ते रद्द होण्याचे कारण आयपीएलचा दुसरा टप्पा आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. आता इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) प्रमुख टॉम हॅरिसन यांनी वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की,”मँचेस्टर कसोटी रद्द करण्याशी आयपीएलचा काहीही संबंध नाही.”

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे मालिकेच्या चौथ्या कसोटी दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर सपोर्ट स्टाफचे इतर सदस्यही या व्हायरसच्या कचाट्यात आले. मँचेस्टर कसोटीपूर्वीच टीम इंडियाच्या फिजिओथेरपिस्टचा कोरोना टेस्टिंग रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. अशा स्थितीत मालिकेतील शेवटचा कसोटी सामना रद्द करावा लागला. त्यानंतर एका रिपोर्टमध्ये ECB ने असे म्हटले की,” भारत या सामन्यासाठी आपला संघ मैदानात उतरवू शकणार नाही, मात्र आता टॉम हॅरिसनने ते सर्व रिपोर्ट फेटाळून लावले आहेत.”

दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, भारत अंतिम कसोटीची तारीख वाढवण्यास उत्सुक आहे.” मात्र, ECB प्रमुखांनी ते सर्व रिपोर्ट फेटाळून लावले आणि सांगितले की,” कसोटी रद्द केल्याचा आयपीएलशी काहीही संबंध नाही.” त्यांनी बीबीसी स्पोर्टला सांगितले,”आयपीएल -2021 च्या दुसऱ्या टप्प्यामुळे हा सामना रद्द करण्यात आलेला नाही. हा भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रिकेटचा तितकाच चाहता आहे जितके आपल्या देशात त्याचे चाहते आहेत आणि जितके आपल्या क्रिकेट संघाचे आहेत. लोकांना असे वाटले की भारताचे खेळाडू कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मैदानावर उतरू शकत नाहीत, हे समजण्यासारखे आहे.”

टॉम हॅरिसन पुढे म्हणाले कि,”हे लक्षात घेतले पाहिजे की मँचेस्टर कसोटी सामना पुन्हा खेळवण्यासाठी योग्य विंडो शोधण्यासाठी BCCI आणि ECB एकत्र काम करत आहेत. हे देखील पाहिले पाहिजे की, खेळाडूंचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊनच सर्व काही केले जाईल, जी या क्षणी महत्वाची गोष्ट आहे. विशेषतः दौऱ्याचा कालावधी देखील खेळाडूंवर परिणाम करू शकतो आणि म्हणूनच व्यवस्थापनाने घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.”

Leave a Comment