चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंमुळे मंदिरा अनेकदा चर्चेत आली आहे. आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करायला तिला खूप आवडतं. तिचे अनेक बिकीनी फोटोही याआधीही सोशलवर व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा आपल्या बिंधास्त फोटोमुळे आणि त्याच्या कॅप्शनमुळे मंदिरा चर्चेत आली आहे.
मंदिरा आजही खुंदर आणि यंग दिसते. स्वत:ला मंदिरानं खूप फिट ठेवलं आहे. अनेकांनी तिला एजलेस ब्युटी म्हणलं आहे. काहींनी असंही म्हटलं की, तुझं वय वाढत नाही का. मंदिराचं वय जरी 47 वर्षे असलं तर तिच्याकडे पाहून जराही तिच्या वयाचा अंदाज येत नाही.
मंदिरानं ब्लेझर आणि बूट घातलेला एक फोटो शेअर केला आहे. या खास फोटोमुळे आणि त्याच्या कॅप्शनमुळे ती चर्चेत आली आहे. आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मंदिरा म्हणते, ‘Suit-Boot toh pehen liya. Patloon kaise bhooley?’ स्वत: पँट घालायचं विसरल्याचं तिनं म्हटलं आहे.
मंदिराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत तिनं लग्न केलं. तिला 8 वर्षांचा मुलगाही आहे. मंदिरा आजही खूप यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जीम, योगा आणि स्विमिंग असं सगळं करत असते.
मंदिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती साहो या सिनेमात झळकली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, इत्तेफाक, शादी का लड्डू, दस कहानिया, वोडका डायरीज अशा अनेक सिनेमात मंदिरा भूमिका साकारली आहे.