दुचाकीवरून निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरटयांकडून लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या विश्रामबाग परिसरातील वाडीकर मंगल कार्यालय ते बिरनाळे कॉलेज पर्यंत दुचाकीवरून निघालेल्या महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी हिसडा मारून लंपास केले. सदरची घटना हि शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिरनाळे कॉलेज समोर घडली. या प्रकरणी वीणा रमाकांत सारडा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वीणा सारडा या सांगलीतील बापट मळा परिसरात आपल्या कुटुंबियांसह राहतात. शनिवार दि. 05 रोजी सायंकाळी त्या वाडीकर मंगलकार्यालय परिसरात कामानिमित्त गेल्या होत्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून परत येत होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघा अज्ञातांनी त्यांचा पाठलाग केला. सारडा या बिरनाळे कॉलेज समोर आल्या असता त्यातील एका व्यक्तीने सारडा यांचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरले. त्यानंतर दोघांनी तेथून भरधाव वेगाने दुचाकीवरून पळ काढला. घडलेल्या या प्रकारानंतर सारडा या गोंधळल्या होत्या. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.

विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही फुटेज द्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वीणा सारडा यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment