दर्शनासाठी आलेल्या दोन महिलांचे मंगळसूत्र पळविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भक्तांचे मंगळसूत्र पळविल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घडली. अज्ञात महिला चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सगुणाबाई कडुबा पांढरे, वय 60, (रा केर्हाळा ता. सिल्लोड) यांचे पती कडुबा पांढरे यांच्यासोबत वडगाव कोल्हाटी राहणारा नातू सुदर्शन मगर यांच्या घरी आल्या होत्या. आषाढी एकादशी असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी सगुणाबाई व पती व नातवासह छोट्या पंढरपुरात आल्या. मंदिर बंद असल्याने त्या प्रवेशद्वारासमोरच दर्शन घेत असताना एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले आणि 80 सोन्याचे मणी असलेली पोत गर्दीत पळवली.

काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर सगुणाबाई यांनी आरडाओरड केला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच दर्शन घेत असताना सकाळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या जाड व सावळ्या रंगाच्या महिलेने सगुणाबाई यांच्या गळ्यातील 4 ग्राम वजनाचे डोरले व सहा ग्रॅम वजनाचे 80 मनी असलेली 25 हजाराची पोत अलगदपणे काढून पसार झाली. याच बरोबर बजाजनगर परिसरातील अर्चना पाटील यांचे मंगळसूत्र मंदिर परिसरातून त्यांनी आरडाओरड केला. मात्र गर्दीतून चोरटा सोन्याचे पेंडल घेऊन पसार झाला. याप्रकरणी सगुणाबाई पांढरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सचिन पावडे हे करत आहेत.

Leave a Comment