मंगळवेढा पंचायत समितीवर अवताडे गटाचे वर्चस्व; सभापतीपदी प्रेरणा मासाळ

0
98
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडत आहेत. पंचायत समिती सभापतीपदी अवताडे गटाच्या प्रेरणा मासाळ तर उपसभापतीपदी सूर्यकांत ढोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीमध्ये जिल्हा बँकेचे संचालक बबनराव अवताडे आणि दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांचे वर्चस्व कायम राहिले. हुलजंती गावाला प्रेरणा मासाळ यांच्या रूपाने पहिल्यांदाच सभापती मिळाला असल्याने गावकऱ्यांनी जेसीबीने गुलाल उधळून आनंद साजरा केला.

सोलापूरमधील बाजार समितीसाठीही एक दिवसापूर्वीच निवडणूक पार पडली होती. मोठ्या तालुक्यांच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असं चित्र रंगत असताना मंगळवेढ्यात मात्र अवताडे गट विरुद्ध बाकी अशी लढत रंगल्याचं पहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here